वृक्षारोपण कार्यक्रम - २०२४
नमस्कार . महाराष्ट्र ब्राम्हण सभा आरोग्य विभाग तर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम कर्मप्रेरित झाला .
कार्यप्रेरणा ही सर्वात असतेच ..पण ते कार्य करण्यासाठी मुक्त व्यासपीठ मिळवून देणे अनिवार्य असते ..ते काल आदरणीय अध्यक्ष डॉ व्यास सर आणि आदरणीय अभिजीत सर यांच्यामुळे मिळाले .. आदरणीय प्रदीप रत्नपारखी सर उपस्थित होते.
केवळ मनोरथ उपयोगाचे नाही तर प्रत्यक्ष काम करणे आवश्यक असते.हे कार्य साध्य होण्यासाठी प्रयत्न साकार केले डॉ सचिन सर यांनी ..त्यांना उत्साही साथ मिळाली ती त्याच्या सक्रिय कार्यकारिणीची ..
मनुष्यबळ आणि निरपेक्ष अशी साथ होती ती डॉ जगताप सर आणि श्री गावडे सर यांची ..
महाराष्ट्र ब्राम्हण सभा देशाचे भविष्य घडवीत आहे याचा प्रत्यय दिला सर्व बालचमूंनी
चहापान आणि नाष्टा याने खेळकर सांगता झाली आरोग्य विभागाच्या कार्यक्रमाची ..
सर्वांचे खूप आभार..
जे ऐन वेळेस येवू शकले नाहीत त्यांनी पुढील वेळी नक्कीच प्रयत्न करावा ..आपले स्वागत..
ज्यांनी या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लावण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे आभार ..
कुणाचे नाव राहिले असेल तर क्षमस्व ..कारण आपण सर्वजण महत्त्वाचे आहातच ..
एका सर्वोत्तम कार्यक्रमासाठी मी सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करते .
धन्यवाद .
डॉ कांचन व्यंकटेश खैराटकर.
महाराष्ट्र ब्राम्हण सभा
आरोग्य विभाग प्रमुख
केंद्रिय कार्यकारिणी सदस्य.
पुणे.