“विश्वशांतीचा मार्ग भारतीय संस्कृतीच दाखवेल” – डॉ.संजय उपाध्ये

पुणे – अभी ‘भक्ती’ चे स्वातंत्र्य असलेली भारतीय संस्कृतीच जगाला विश्वशांतीचा मार्ग दाखवेल, असे प्रतिपादन डॉ.संजय उपाध्ये यांनी शनिवारी महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या कार्यक्रमात बोलताना केले.

महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या पुणे शाखेच्यावतीने ‘संख्या विरूद्ध सांख्य’ या विषयावर डॉ.संजय उपाध्ये यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, भारतीय संस्कृतीला संस्थापक नाही, ठराविक आचरण ग्रंथ नाही, ही संस्कृती म्हणजे धर्म ही नाही. मात्र, तरीही ही संस्कृतीच जगाला शांतता देऊ शकेल. संख्येच्या जोरावर सत्ता प्राप्त केली जाते. तर, विश्वशांतीसाठी सांख्यी म्हणजे ज्ञानी लोकांनी एकत्र यायला हवे. ज्ञानी एकत्र आले तर अनेक गोष्टी साध्य करता येतील.

कार्यक्रमाला ज्येष्ठ जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर प्रमुख पाहुणे होते. ऋतुजा फुलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वाङ्मय गोडबोले यांनी आभार मानले. श्रेया जोग यांनी वंदेमातरम् सादर केले.

Scroll to Top