महिला हिंसाचाराच्या दृश्यांवर ‘सावधानता इशारा’ दाखविण्याची मागणी – महाराष्ट्र ब्राह्मण सभा महिला आघाडीने राज्यसभा खासदार सौ. मेधा ताई कुलकर्णी यांना दिले निवेदन

महाराष्ट्र ब्राह्मण सभा महिला आघाडीच्या प्रतिनिधींनी आज राज्यसभा खासदार सौ. मेधा ताई कुलकर्णी यांची भेट घेतली. यावेळी महिला संबंधी हिंसाचाराच्या दृश्यांवर तंबाखूजन्य पदार्थांवर दाखविल्या जाणाऱ्या धोक्याच्या इशाऱ्यासारखा ‘सावधानता इशारा’ दाखविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या दृश्यांमध्ये दाखविलेल्या हिंसाचारासंबंधी संबंधित कायद्याच्या कलमांचा उल्लेख करणे अनिवार्य असावे, अशी विनंती करण्यात आली.

आजकाल दूरदर्शन मालिका आणि चित्रपटांमध्ये कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार अशा दृश्यांचे वारंवार चित्रण होत आहे. या प्रस्तावाची कल्पना सौ. मृणाल कुलकर्णी बाम (लातूर) यांच्या सूचनेतून आली. हा प्रस्ताव सौ. मंजिरी सहस्रबुद्धे (महिला आघाडी प्रमुख, महाराष्ट्र राज्य), सौ. अश्विनी मेहरुंकर (सदस्य, महाराष्ट्र राज्य समिती), सौ. दीपा रंगण (महिला आघाडी प्रमुख, पिंपरी-चिंचवड जिल्हा), सौ. अंतर्रा देशपांडे, सौ. शुक्ला, श्री. सुभाष फाटक (खजिनदार, महाराष्ट्र राज्य), श्री. अभय ओरपे (सचिव, महाराष्ट्र राज्य), अॅड. श्रीराम जोशी (उपाध्यक्ष, वकील आघाडी, महाराष्ट्र राज्य) यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला.

महिलांच्या सुरक्षिततेच्या दिशेने उठवलेले हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. महाराष्ट्र ब्राह्मण सभा नेहमीच आपल्या माताभगिनींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देते.

Scroll to Top