महाराष्ट्र ब्राह्मण सभेतर्फे 100% मतदान व 100% हिंदुत्वला मतदान याचा प्रचार व प्रसार पिंपरी चिंचवड मध्ये करण्यात आला.

मागील रविवारी महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे काही सदस्य एकत्र येऊन त्यांनी यमुना नगर परिसरात घरोघर जाऊन अनेक लोकांची भेटी घेऊन त्यांना एक पत्रक दिले ज्यामध्ये शंभर टक्के मतदान कराच करा पण शंभर टक्के मतदान हे हिंदुत्वाला करा हेही सांगण्यात आले. महाराष्ट्र ब्राह्मण सभा हे चांगल्या पद्धतीने जाणून आहे की हिंदुत्व हेच समाजाच्या उन्नतीचे व सर्वांगीण विकासाची व समृद्धीची गरज आहे. म्हणून सगळ्यांनी सकाळी आठ वाजता एकत्र येऊन वेगवेगळ्या भागांमध्ये घरांमध्ये त्याचबरोबर दुर्गादेवी टेकडी जिकडे मोठ्या संख्येने लोक व्यायाम करायला येत असतात त्यांच्यामध्ये एक पत्रक घेऊन त्यांना शंभर टक्के मतदान आणि शंभर टक्के हिंदुत्वाला मतदान याबद्दल आवाहन करण्यात आले.


 
Scroll to Top