महाराष्ट्र ब्राह्मण सभा शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा

सामाजिक समरसतेचा अनोखा उपक्रम:

महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त अनेक महत्त्वाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात ( Pune )आले. या महोत्सवाचा मुख्य उद्देश सामाजिक समरसता वाढवणे आणि सर्व समाज घटकांना एकत्र आणणे होता.

विश्वशांती यज्ञाचे आयोजन कार्यक्रमाची सुरुवात विश्वशांती यज्ञाने झाली. विशेष म्हणजे, या यज्ञामध्ये 18 पगड जातींतील लोक यजमान म्हणून सहभागी झाले होते. हा उपक्रम खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि विश्वशांतीच्या दिशेने असलेला प्रयत्न होता.

यज्ञानंतर कार्यक्रमाची सुरुवात धम्म की पाठशालेतील विद्यार्थ्यांनी संविधानाचे प्रियांबल वाचन करून केली. उपस्थित सर्वांनी प्रियांबलचे वाचन करून संविधानाच्या अमृत महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले.

पुरस्कार वितरण शताब्दी महोत्सवात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार कर्नल डी.एच. कुलकर्णी यांना, स्वर्गीय माई विनायक सावरकर पुरस्कार सौ. शुभांगी सरोटे यांना, आणि स्वामी विवेकानंद युवा भूषण पुरस्कार नरेंद्र काशीकर यांना प्रदान करण्यात आला.

हिंदुत्व योद्धांचा सन्मान हिंदुत्वासाठी योगदान देणाऱ्या योद्ध्यांचे पाद्यपूजन करून त्यांना ‘हिंदुत्व योद्धा’ या पदवीने गौरवण्यात आले. त्यांना प्रशस्तीपत्रक आणि मेडल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

सामाजिक समरसतेचे कार्य महाराष्ट्र ब्राह्मण सभा नेहमीच सामाजिक एकोप्याच्या उद्देशाने कार्यरत राहिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दाखवलेल्या हिंदुत्वाच्या मार्गावर चालत, सभा समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य करते. कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांचा सहभाग या भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा महोत्सव यशस्वीपणे पार ( Pune ) पडला.


 

Scroll to Top