अमृत परिसंवाद

८-ऑक्टोबर-२०२४, पालघर: काल महाराष्ट्र ब्राह्मण सभा आणि गोवर्धन ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर येथे अमृत परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश अमृत योजनेची माहिती देणे, अर्ज कसा करावा, निकष आणि इतर लाभ याविषयी खुल्या वर्गासाठी माहिती देणे हा होता.

हा कार्यक्रम बोईसर, पालघर येथे आयोजित करण्यात आला होता.

मुख्य वक्ते श्री विजय जोशी, व्यवस्थापकीय संचालक अमृत यांनी या शासकीय योजनेचे सविस्तर विवेचन केले. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान श्रीराम दांडेकर (कॅमलिन) आणि गोवर्धन ब्राह्मण संघाचे प्रमुख श्री प्रकाश पांडे यांनी भूषवले.

AMRUT-Parisanvaad-Boisar
Scroll to Top