महाराष्ट्र ब्राह्मण सभा

स्थापना – ६ जानेवारी १९२६.

 

रजि. नं. F११७  /  ८०-G सवलत प्राप्त

"देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो."
-स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर

ब्राह्मण समाजाच्या पुनरुत्थानासाठी व समाजोन्नतीसाठी आपल्या समाजातल्या कै.ज.ल. आपटे, कै. कृ.भा.चितळे, कै. ज.स. करंदीकर (केसरीचे संपादक), कै. गं.बा. काळे व कै. शं.रा.दाते वगैरे द्रष्ट्याधुरिणांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्यासारख्या प्रखर राष्ट्राभिमानी व्यक्तिमत्त्वाकडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र ब्राह्मण सभा दिनांक ६ जानेवारी १९२६ रोजी स्थापन केली. समाजाला आलेली मरगळ व नैराश्य झटकून टाकण्यासाठी व पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली. स्थापनेपासून शताब्दी वर्ष पूर्तीकडे यशस्वी वाटचाल करताना संस्थेने अनेक समाजपयोगी उपक्रम राबवलेले आहेत.

🚨ताज्या घडामोडी🚨

25 November 2024

हिंद की चादर श्री गुरु तेगबहादुर जी की पुण्यतिथी

काश्मिरी पंडित,सिख और सनातनी भाईयों ने इस कार्यक्रम मे जमकर हिसालिया और गुरु तेग बहादुर जी को श्रद्धांजलि अर्पित की.
Read More
25 November 2024

गुरुतेग बहादुर जी का शहीद दिवस

आज शहीद दिवस पर हम सभी सनातनी आज देहूरोड के गुरुद्वारा जाकर अपना मथा टेक कर आ गये. आज गुरुतेग...
Read More
13 November 2024

महाराष्ट्र ब्राह्मण सभेतर्फे 100% मतदान व 100% हिंदुत्वला मतदान याचा प्रचार व प्रसार पिंपरी चिंचवड मध्ये करण्यात आला.

मागील रविवारी महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे काही सदस्य एकत्र येऊन त्यांनी यमुना नगर परिसरात घरोघर जाऊन अनेक लोकांची भेटी घेऊन त्यांना...
Read More
टॉप १० बातम्या

आजचा उद्योजक (Spotlight)

DR SHISHIR H.PARANJAPEHealthcare ServicesHOMEOPATHIC CONSULTANTSunview 8-B, Shop No. 6, Antariksha soc. roadastu-udyog Colony, Pimpri-Chinchwad, Maharashtra 4110189423562088DR SHISHIR H.PARANJAPE

ब्राह्मण व्यावसायिक व लघुउद्योजक यांच्या विविध सेवा आणि वस्तुंसाठी

ठळक क्षणचित्रे

चर्चेतले विषय

“विश्वशांतीचा मार्ग भारतीय संस्कृतीच दाखवेल” – डॉ.संजय उपाध्ये

पुणे – अभी ‘भक्ती’ चे स्वातंत्र्य असलेली भारतीय संस्कृतीच जगाला विश्वशांतीचा मार्ग दाखवेल, असे प्रतिपादन डॉ.संजय उपाध्ये यांनी शनिवारी महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या कार्यक्रमात बोलताना केले ...
वृक्षारोपण कार्यक्रम

महाराष्ट्र ब्राम्हण सभा आरोग्य विभाग तर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम – २०२४

वृक्षारोपण कार्यक्रम - २०२४ नमस्कार . महाराष्ट्र ब्राम्हण सभा आरोग्य विभाग तर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम कर्मप्रेरित झाला .कार्यप्रेरणा ही सर्वात असतेच ..पण ते कार्य करण्यासाठी ...
सुशील कुलकर्णी यांचे संबोधन

“आमची मुलं सुरक्षित आहेत का ???”

"कुटुंबाला प्रेमाचे, संस्कारांचे कुंपण आवश्यक" : सुशील कुलकर्णी ‘‘आपले कुटुंब सुरक्षित करण्यासाठी प्रेमाचे, संस्काराचे कुंपण घराला असणे गरजेचे आहे. घरात मुलांवर लक्ष ठेवणारी पिढी कुटुंबापासून ...

📖नक्की वाचा

📂खुल्या प्रवर्गासाठी विविध शासकीय योजना

अमृत संस्थेच्या विविध योजना

प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक व युवती तसेच इतर उमेदवारांसाठी उपक्रम व कार्यक्रम ...

खास सभासदांसाठी..

पुरस्कार आणि कौतुक

संस्थेचे विविध आयाम

वर्षभरामध्ये संस्थेतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. प्रामुख्याने युवा क्रीडा पुरस्कार, सामाजिक पुरस्कार, उद्योजक पुरस्कार, धन्वंतरी पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श महिला पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, या व अशा अनेक पुरस्कारांनी आपल्या समाजातील ज्ञात अज्ञात संस्कारांना, कलागुणांना समाजासमोर आणण्याचे कार्य संस्था अविरत करत आलेली आहे. वरील सर्व प्रकारचे पुरस्कार उपक्रम राबवण्यासाठी सभासद वर्गणी व संस्थेला वेळोवेळी मोलाचे अर्थसहाय्य करणाऱ्या बँका, वित्त संस्था, व्यावसायिक, प्रतिष्ठित नागरिक व सर्वसाधारण सभासदांच्या सहकार्याने हे सर्व करणे शक्य होत आलेले आहे.

संस्थेच्या विविध आयामां अंतर्गत होणारे कार्येक्रम

Adarsha Shikshak
आदर्श शिक्षक पुरस्कार
शैक्षणिक कार्येक्रम
शैक्षणिक मदत
गोसेवा कार्य
कीर्तन महोत्सव
विविध व्याख्यानमाला

विशेष उल्लेखनीय

किराणा किट वाटप – छ. संभाजी नगरचे शहर प्रमुख श्री मंदार देशपांडे यांनी कोविड लॉकडाऊनच्या कालावधीत सुद्धा ४० पेक्षा जास्त कुटुंबांना किराणा किट वाटपाचे काम बंद पडू दिले नाही व आजतागायत ते चालू आहे.

सामूहिक धार्मिक पारायण – हैदराबादच्या धर्म जागरण प्रमुख सुरेखा जोशी यांनी ३५ पेक्षा अधिक पारायणांचे आयोजन करून पारायण करणाऱ्यांची संख्या 300 पर्यंत नेली आहे. या विषयातील १०८ whatsapp ग्रुप त्या एकट्या यशस्वीपणे सांभाळतात.

आरोग्य विभाग – पुण्याच्या आरोग्य विभाग प्रमुख डॉ. सौ. कांचन खैराटकर यांनी शालेय विद्यार्थिनींचे आरोग्य व त्या विषयातील महत्त्वपूर्ण समुपदेशन
शाळाशाळांमधून केले.

सर्वांसाठी आवाहन

महाराष्ट्र ब्राह्मण सभा ही संस्था १९२६ सालापासून समाजातील सर्व स्तरांसाठी कार्यरत आहे. 

परंतु हे सर्व समाजकारण ज्या गोष्टीवर आधारलेले असते ते म्हणजे अर्थकारण.

 आर्थिक स्थैर्य शिवाय संस्था प्रगतीपथावर कार्यरत राहू शकत नाही. आजपर्यंत संस्थेच्या मागे खंबीरपणे उभ्या असलेल्या सर्व वर्गणीदारांचे आभार! 

तसेच आपणा सर्वांना असे आवाहन आहे की आपणही संस्थेच्या या कार्यात आपला यथाशक्ती भार उचलावा.

 आपण संस्थेला आर्थिक मदत विविध स्वरूपात करू शकता.

संस्थेला ८०जीचे प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे.

Scroll to Top